ImgPlaceholder
Third slide

Spardha Pariksha Mahotsav

"MPSC Students Rights" यांच्यावतीने स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम. आज महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. बहुसंख्य तरुण हे ग्रामीण भागातील गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत. हे तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी जात असतात कारण तेथेच त्यांना क्लास , अभ्यासिका , पुस्तके उपलब्ध होतात.
ग्रामीण भागातील या तरुणांना सरकारी नोकरीचे वाढलेले आकर्षण पाहता हे विद्यार्थी क्लास करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येतात, ते जेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी येतात तेव्हा मात्र त्यांना बऱ्याच अडचणी येतात. जसे की क्लास करावा की न करावा, करावा तर कोणता क्लास करावा, अभ्यास कसा करावा, मार्गदर्शन कोणाकडून घ्यावे असे अनेक प्रश्न विध्यार्थ्यांना सतावताना दिसत होते, हेच प्रश्न पालकांनाही सतावत असतात त्यामुळे विद्यार्थींची दिशाभूल होऊ नये, त्यांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी स्पर्धा परिक्षा महोत्सवाची संकल्पना समोर आली.
स्पर्धा परीक्षा महोत्सव मध्ये विद्यार्थ्यांना तुलनात्मक माहिती मिळावी म्हणून महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परिक्षा classes, प्रकाशक,मार्गदर्शक यांना आपण एकाच छताखाली आणत आहोत ; तसेच स्पर्धा परीक्षेतील, वास्तव, भवितव्य, दिशा दाखविण्यासाठी प्रशासकीय सेवेतील अधिकारी, निवृत्त अधिकारी देशात/राज्यात प्रथम आलेल विध्यार्थी, समाजसेवक, व्यावसायिक व इतर तज्ञ मंडळींना आमंत्रित करत आहोत. तसेच जे विद्यार्थी नैराश्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी समुपदेशन करण्यासाठी तज्ञ व्यक्तींना आमंत्रित करत आहोत. MPSC संदर्भातील अडचणींसाठी मदत कक्ष उभारला जाणार आहे. गुणवंतांचा सन्मान केला जाणार आहे. काही अधिकारी विदयार्थ्यांशी हितगुज साधण्यासाठी आमंत्रित केले जाणार आहे.

MPSC STUDENTS RIGHTS

MPSC STUDENTS RIGHTS ही संघटना विद्यार्थ्यांनी विद्यार्थी हितासाठी चालवलेली अराजकीय चळवळ! स्पर्धा परीक्षेमधील विशेषतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधील अनिश्चितता व त्यामुळे उमेदवारांचे वाढत्या वयामुळे परीक्षेतून बाद होणे, MPSC परीक्षेमधील विद्यार्थी व पदे यांचा Ratio कमी करणे, परीक्षेमधील अचानक केलेले बदल, आरक्षण, परीक्षेमधील होणारे घोटाळे, सरकारने केलेली नोकरभरती कपात व MPSC मधील इतर सुधारणांसाठी MPSC STUDENTS RIGHTS ही संघटना वेळोवेळी विद्यार्थी हितासाठी रस्त्यावर उतरत असते.
राज्यातील तरुणांच्या भवितव्यासाठी MPSC STUDENTS RIGHTS ही संघटना मोर्चे, आंदोलन, उपोषण, पदयात्रा, मॅरेथॉन या माध्यमातून सरकारपर्यंत आवाज पोहचवत असते. तसेच अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सभागृहामध्ये मांडून विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकार पर्यंत पोहोचविल्या जातात. याचसोबत विद्यार्थ्यांच्या MPSC मधील विविध अडचणी जसे की अभ्यासाविषयी मार्गदर्शन, फॉर्म भरतानाच्या येणाऱ्या अडचणी व इतर सर्व अडचणींसाठी विद्यार्थ्यांसाठी मोफत कक्ष सुरू केलेले आहे.

Third slide